साकेब उस्मानी यांना पीएचडी

 *साकेब उस्मानी यांना पीएचडी* 





लातूर : येथील साकेब अब्दुल हकीम उस्मानी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने व्यवस्थापनशास्त्र विषयात शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. या यशप्राप्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

साकेब उस्मानी हे लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, येथून प्रा. डॉ. पी. एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "A Study of Drought and Its Impact on Socio-Economic Conditions of Farmers in Marathwada Region" या विषयावर संशोधनपर प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. प्रबंधाचे मूल्यमापन होऊन संशोधनाचे सादरीकरण व तोंडी परीक्षेमध्ये यशस्वी बचाव केल्यानंतर विद्यापीठाच्या दिनांक 22/06/2024 रोजीच्या अधिसूचनेद्वारे त्यांना पीएचडी बहाल करण्यात आली आहे. 

या संशोधनात उस्मानी यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यात निर्माण झालेले दुष्काळ, 1901 ते 2022 पर्यंतच्या ऐतिहासिक पर्जन्यामानाच्या डेटाचे विश्लेषण, दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर होणारा सामाजिक - आर्थिक परिणाम, दुष्काळाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास, दुष्काळ व्यवस्थापनाच्या उपाययोजना / धोरणाचा अभ्यास, मराठवाड्यातील समुदाय आधारित दुष्काळ व्यवस्थापन पद्धतींचे विश्लेषण ई. बाबीचे अभ्यास केले. तसेच प्रबंधात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक जलसंपन्न गाव निवडून त्या गावची केस स्टडी मांडली असून ज्याद्वारे समुदाय आधारित दुष्काळ व्यवस्थापनाचे महत्व अधोरेखित केले आहे. प्रबंधात एकूण दहा केस स्टडीजचा समावेश केला आहे. 

त्यांच्या या यशाबद्दल वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. डी.एम. खंदारे, सहा. अधिष्ठाता प्रा. डॉ. एच.एस. पतंगे, पी.जी.सेक्शनचे उपकुलसचिव श्री. मेघशाम साळुंके-पाटील, रेफरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील व्यवस्थापनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अभिजित शेळके, विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक प्रा. डॉ. आर. एस. शिंदे, प्रा. डॉ. संभाजी माने, प्रा. डॉ. एच. एस. पाटील, डॉ. पी. एच. पाटील, डॉ. एन.सी. वारभुवन, डॉ. डी. एल. बोईनवाड, सर्वश्री रफिक शेख, सुरेश येलगटे, आनंद भोसले, सुरेंद्र तिडके, श्रीराम वाघमारे, श्रीमती शोभा कावळे यांनी अभिनंदन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी यावेळी संचालक उपकेंद्र लातूर, संशोधन मार्गदर्शक, संचालक सर्व संकुले, विद्यापीठ व उपकेंद्रतील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कुटुंबीय, कार्यालयीन सहकारी, मित्रपरिवार यांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जी. श्रीकांत, पृथ्वीराज बी.पी., विद्यमान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूरचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे, विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी श्री. केशव नेटके, सोलापूर विद्यापीठाचे से.नि. प्र. कुलगुरू डॉ. डी. एन. मिश्रा यांचे विशेष आभार मानले. सदरील संशोधन कार्य त्यांचे वडील पै. इंजि. अब्दुल हकीम उस्मानी यांना समर्पित केले. साकेब उस्मानी यांना मे, 2021 मध्ये एम.फील. पदवी प्रदान करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी विहित मुदतीत डॉक्टरेट पूर्ण केले आहे; हे विशेष.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या