ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी अन्यथा उपोषन करण्याचा दिला इशारा
शेख बी जी
औसा:दि.19 ग्रामीण जनता ही आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांना आरोग्याची समस्या दूर करण्यासाठी सर्वात मोठा राजमार्ग म्हणजे शासकीय दवाखाना असल्याने या ठिकाणी सर्व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी आणि गोरगरीब जनतेचे आरोग्य रक्षण करावे.
याकरिता मराठा शिवसेवक संघ महाराष्ट्र राज्यचे लातूर जिल्हाध्यक्ष आकाश प्रकाश पाटील यांनी नुकतेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय औसा यांना निवेदन दिले असून रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी आणि अशी सेवा जर उपलब्ध नाही झाली तर कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला असून होणाऱ्या परीनामास आपण जबाबदार असाल असे निवेदनात म्हंटले आहे .दिनांक 24 जुलै 2024 रोजी पर्यंत जर कर्मचारी मुख्यालय राहून सेवा देत नसतील तर आपल्या कार्यालयासमोरच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.अन्यथा होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय आणि कर्मचारी जबाबदार राहतील असे निवेदनाद्वारे कळविले आहे.
यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी याबाबत कोणता निर्णय घेतील या बाबीकडे औसा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.