किल्ला मैदान ते पावर हाऊस पर्यंतचा रस्ता तात्काळ दुरुस्त करा-सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी एम बी मणियार
किल्ला मैदान ते पावर हाऊस हा रस्ता गावातील दक्षिणेकडील मुख्य रस्ता असून सदर रस्ता हा पुढे राष्ट्रीय महामार्ग ला जोडतो. सदर रस्त्यावर किल्ला आहे तसेच याच रस्त्यावर पुढे आझाद महाविद्यलाय व इतर महाविद्यालय आहेत. सदर रस्ता हा अत्यंत वरदळीचा असून सदर रस्त्यावर पुढे 50 गावे जोडली जातात. तसेच तोच रस्ता पुढे मार्केट यार्डास जोडतो. सदर रस्ता हा अत्यंत खराब झालेला असून यामुळे महिला वृध्द नागरी तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.
तरी सदर रस्ता त्वरीत डांबरीकरण करुन घेण्यात यावा व त्याची योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा एम.आय.एम. च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.