पाटबंधारे विभाग क्र.1 चे उपकार्यकारी अभियंता नितीन बी पाटील ..
औसा : - सामाजिक जागृतीचे सततचे ध्येय आणि ते कार्य दररोज अखंडपणे सुरू ठेवत असलेल्या वृक्ष प्रतिष्ठान, लातूर यांच्या अध्यक्षा तथा पाटबंधारे विभाग क्र,१ लातूर येथील उपकार्यकारी अभियंता श्रीमती सुनंदा गोरे- जगताप यांचा दि. ३१ जूलै २०२४ बुधवार रोजी रीतसर सेवापूर्ती निमित निरोप देण्यात आला. त्यांचा अतिरिक्त पदभार लातूर जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता नितीन बी पाटील यांना देण्यात आला असून तो अतिरिक्त पदभार नुतन उप कार्यकारी अभियंता नितीन बी पाटील यांनी स्विकारला आहे .त्या निमित्ताने सिंचन भवन लातूर येथे माजी अभियंताचा निरोप समारंभ व नुतन उप कार्यकारी अभियंताचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकारी अभियंता व विभागातील सर्व कर्मचारी यांच्या मार्फत अभियंता पाटील यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ दिले व कार्यकारी अभियंता अमर पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या निवडीबद्दल सिंचन भवन, जलसंपदा विभाग, परिसरातील चारही विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील स्नेही मित्रमंडळी आणि पत्रकार मित्रमंडळी तर्फे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.