महेश्वरी कॉम्प्युटर व अभ्यासिका केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*

 *महेश्वरी कॉम्प्युटर व अभ्यासिका केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*






औसा(प्रतिनिधी)-येथील महेश्वरी कॉम्प्युटर व अभ्यासिका केंद्रातील 26 विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत विविध खात्यातील परीक्षेत यश संपादन करून एक नवा  विक्रम प्रस्थापित केला आहे.विशेषता ग्रामीण भागातील मुलांनी कोणतीही शिकवणी न लावता फक्त अभ्यासिकेत बसून अभ्यासामध्ये सातत्य ठेवून अनंत अडचणीवर मात करून यशाला गवसणी घातली आहे आणि स्वतःची क्षमता अभ्यासाच्या जिवावर सिद्ध करून दाखवली आहे.ज्यात जाधव मारुती नाशिक पोलीस,फरतडे निलेश,नवी मुंबई पोलीस,रा.बोरफळ.यादव ऋषिकेश,नवी मुंबई पोलीस,नलगे राहुल,गडचिरोली एस.आर.पी रा.औसा.माने शैलेश कृषी सहाय्यक बुलढाणा रा.आशिव,कोहाळे नारायण बीड तलाठी रा.हरेगाव,होळकर नितेश सहाय्यक लेखापाल गडचिरोली रा.औसा,डोंगरे गणेश नाशिक पोलीस रा.हरेगाव,भोसले संतोष,आरोग्य विभाग नागपूर,औसा,अमोल राठोड संभाजीनगर तलाठी,औसा,स्वामी मनमथ एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर,फडणीस सुरज सहाय्यक लिपिक,मुंबई मंत्रालय रा.औसा,कोहाळे रितेश तलाठी रा.हरेगावं,वीर सतीश वनरक्षक सातारा,रा.वानवडा,जमादार सचिन मुंबई पोलीस रा.बोरफळ,पांढरे ओंकार मुंबई पोलीस रा.तुंगी,कोहाळे आनंद,नगर परिषद अभियंता,कोहाळे ज्ञानेश्वर,सहाय्यक अभियंता,खंडू सूर्यवंशी मुंबई पोलीस,तुंगी,जाधव श्रीनिवास सोलापूर पोलीस,रा.तुंगी,माने आकाश वन विभाग नागपूर,गोरे प्रवीण,रत्नागिरी शिक्षक,कोहाळे रितेश नागपूर वनरक्षक,सोनकांबळे मंदाकिनी शिक्षक यांचा समावेश आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक व सन्मान सोहळा महेश्वरी अभ्यासिकेमध्ये साजरा करण्यात आला.तसेच अभ्यासिका प्रमुख सुमित शिंदे यांचा मित्र परीवाराच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी युवा उद्योजक रिजवान पटेल,शेख अत्ताऊल्ला,श्रीधर मसलकर, ऍड.इकबाल शेख,अमजद पठाण, रियाज शेख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या