औसा शहरातील मेन रोडलगत भाजी मंडई ची आरक्षित जागा सोडून तिसऱ्या टप्पयातील रोडचे काम करा मुख्याधिकारी नगर परिषद, औसा कडे मागणी

 .औसा शहरातील मेन रोडलगत भाजी मंडई ची आरक्षित जागा सोडून तिसऱ्या टप्पयातील रोडचे काम करा मुख्याधिकारी  नगर परिषद, औसा कडे मागणी 





औसा सविस्तर वृत असे की सद्या औसा नगर पालिकेच्या वतीने औसा शहरातील जामा मस्जीद चौक ते हनुमान मंदीर लातूर वेस पर्यंत तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाचे काम चालु आहे. हे काम प्रत्यक्ष पाहणी करीता सदरील रोड ४० फुटाची असताना शिवगिरी कलेक्शन पुढे ही रोड मोठी करण्यात आलेली आहे. जे भाजीमंडईसाठी आरक्षीत जागाही रोडच्या कामामध्ये घेण्यात आलेली आहे. जे नियमबाह्य आहे. भाजीमंडईच्या जागेमध्ये रोड बनविल्यास भविष्यात शहरातील शेकडो भाजी विक्रेत्यांना, शेतकऱ्यांना पिकविलेले भाजी विकण्यासाठी जागाच नसणार आहे.

तरी याबाबत त्वरीत भाजीमंडईची आरक्षीत जागा सोडून रोड व नालीचे काम करण्यात यावे तसेच लवकरात लवकर भाजी मंडईची जागा विकसित करुन शहरातील शेकडो भाजी विक्रेते व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी समस्त भाजेविक्रेते मार्फत नजीर कोंडाजी बागवान,अध्यक्ष, भाजी विक्रेता संघ, औसा यांनी केली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या