पत्रकारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया .......विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया
औसा प्रतिनिधी
व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी देश विदेशामध्ये कार्यरत असणारी संघटना आहे वाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणे ,,ज्येष्ठ पत्रकारांची पेन्शन योजना ,पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विमा संरक्षण कवच ,वर्तमानपत्र शासनमान्य यादीवर आणणे, तसेच साप्ताहिकांच्या जाहिरातीचा प्रश्न अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हे संघटन कार्यरत आहे .असे प्रतिपादन विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले. कॉम्प्युटर पार्क औसा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार हे होते. व्यासपीठावर औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे,व्हाईस ऑफ मीडियाचे जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण,लातूर जिल्हा संघटक काकासाहेब गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिर्डी येथे व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे महत्त्वपूर्ण अधिवेशन असून या अधिवेशनात औसा तालुक्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन विजय चोरडिया यांनी यावेळी बोलताना केले.याप्रसंगी संगम कोटलवर आणि काशिनाथ सगरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. बैठकीत साठी सर्वश्री विजय बोरफळे ,आसिफ पटेल, एस ए काझी, इलियास चौधरी ,सुधीर गंगणे, मजहर पटेल, विवेक देशपांडे ,बालाजी उबाळे विठ्ठल पांचाळ, विनायक मोरे ,श्रीकांत चलवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कांबळे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.