धाराशिव,येथील तेरणा महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 27 / 09/ 2024 रोजी मराठी वाङ् मय मंडळाच्या उद्घाटन संपन्न
येथील तेरणा महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 27 / 09/ 2024 रोजी मराठी वाङ् मय मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अशोक घोलकर , तसेच प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक प्राध्यापक डॉ. अरविंद हंगरगेकर यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या भित्तीपत्रिकेचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी मयुरी मुंडे ,श्वेता गाढवे,हर्षदा टकले, तेजस्विनी सलगर यांनी स्वागत गीत सादर केले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. हंगरगेकर यांनी वाङ् मय मंडळाने आपल्यातील प्रतिभेला वाव मिळतो . लेखनाला चालना मिळते, त्यामुळे वाङ् मय मंडळामध्ये राहून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभिव्यक्तीला सिद्ध करावे, असेही ते म्हणाले.आपण कवी, साहित्यिक होण्यात वाङ् मय मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून मराठी भाषेमध्ये करिअरच्या विविध संधी आपणास कशा निर्माण होतील, यासाठी आपण प्रयत्नशील असणे कसे गरजेचे आहे . त्याचबरोबर वाचनाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध बनवता येते. केवळ नोकरी हेच एकमेव आपल्या करिअरचे साधन आहे असे नाही, तर उत्तम वक्ता, उत्कृष्ट सूत्रसंचालक, जाहिरात लेखक, वृत्त निवेदक, कीर्तनकार, भारुडकार मुद्रित शोधक, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले .त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आजच्या काळात नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून आपल्या शैक्षणिक उद्दिष्टांना पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपली स्वप्न साकार करणं हे आपल्याच हातात असतं त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात, इतरांवरती विसंबून चालणार नाही असेही ते म्हणाले. विविध कविता, बोधकथा, विनोदी किस्से यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मूल्य व विचारांचा खूप मोठा ठेवा दिला.
अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ. अशोक घोलकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढे आले पाहिजे, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्या पाठीमागे विद्यार्थ्यांची भूमिकाच महत्त्वाची असते, असेही सांगितले. त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये आपण परिपूर्ण व्हावे .आपले लेखन , आपले वाचन अखंड ठेवणे नितांत गरजेचे आहे, असे केले तरच समाजात आपल्याला योग्य ते न्याय मिळू शकतो, असे आव्हानही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुळशीराम उकिरडे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा जांगीड हीने तर आभार गायत्री जांगीड हीने मानले. प्रमुख उपस्थितीमध्ये जेष्ठ कवी डॉ. मधुकर हुजरे हे उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ. अनघा तोडकरी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,विद्यार्थीनी व प्राध्यापक , प्राध्यापिका तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.