औसा प्रतिनिधी
सन 1948 हैद्राबाद संस्थान भारतात विलीनीकरण झाल्यानंतर पोलीस कारवाईच्या नावावर बहुसंख्य मुस्लीम समुदायाचे संभाव्य झालेले नुकसान आणि हिंदु-मुस्लीम धर्मियात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधानच्या वतीने केंद्र सरकारने मा. पंडित सुंदरलाल कमिशनची स्थापना केली होती या कमिशनने हैद्राबादसह मराठवाडा विभागाचा दौरा करुन केंद्राला आपला अहवाल सादर केला होता. सदर अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. पंडीत सुदरलाल कमीशनने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी.
हैद्राबाद संस्थान 1948 मध्ये भारतात सामील झाले त्या काळात केंद्र सरकारने पोलीस अॅक्शन कारवाई केली. या कारवाईच्या काळात समाज कंटकाकडून मुस्लीम समाजाच्या जिवीताचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असंख्य महिलांवर अत्याचार झाले. अंध, अपंग, निराधार महिलाही त्यामधुन सुटल्या नाहीत. मुस्लीम समाजाची दुकाने लुटण्यात आली. हजारो एक्कर जमीनी बळकावण्यात आली, सोने चांदी अशी संपत्ती पळविण्यात आली. असंख्य जण बेवारस झाले. अश्या कुटुंबाच शोध घेण्यात यावा. त्यांच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यातील दोषींच्या नावे असलेली संपती जप्त करुन नुकसान झालेल्या पिडीतांना आर्थिक मदत द्यावी. तसेच पोलीस अॅक्शनच्या वेळी मृत्यू झालेल्या लोकांचे मृत्यूप्रमाणपत्र नगर पालिकेकडून देण्यात यावे अशी नगर पालिका व ग्रामपंचायत यांना सुचना करण्यात यावी. अशी मागणी आम्ही मागील 14 ते 15 वर्षापासून करीत आहोत. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी अशी मागणी एम आय एम च्या वतीने वऔसा व पिडीतांच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना आज रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
यावेळी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, मौला पठाण,हारुणखॉ पठाण, इस्माईल बागवान, सय्यद शाहबोद्दीन, शेख नय्युम यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.