पै.ॲड.मुजीबुद्दिन पटेल यांच्या स्मरणार्थ गणवेश व शालेय साहित्य वाटप

पै.ॲड.मुजीबुद्दिन पटेल यांच्या स्मरणार्थ गणवेश व शालेय साहित्य वाटप 



औसा(प्रतिनिधी) औसा चे माजी नगराध्यक् ॲड.मुजीबुद्दिन पटेल यांच्या स्मरणार्थ आज येथील हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी माजी नगरसेवक ॲड. समियोद्दिन पटेल,पत्रकार म.मुस्लिम कबीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मुख्याध्यापक म. शफीयुद्दीन पटेल यांनी प्रास्ताविक केले.पत्रकार म.मुस्लिम कबीर व ॲड. समियोद्दिन पटेल यांनी पै.ॲड.मुजीबुद्दिन पटेल यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक पैलू वर आपले विचार व्यक्त केले.शहरासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देत त्यांच्या बिनव्याजी कर्ज योजना विषयी विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन शेख मुजीब सर यांनी केले तर बदियोद्दिन पटेल यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या