दुबईत,पुणे वास्तव्यास असलेल्या मजुराकडून केले रस्त्याचे काम;
रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव रस्ते कामात ऐंशी लाख
रुपयांचा भ्रष्टाचार, ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी..!
लातूर / प्रतिनिधी
औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायत अंतर्गत गावात करण्यात आलेल्या रस्ते कामात तब्बल 80 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असून आतापर्यंत 37 लाख रुपये या महाशयांनी उचलले असल्याचे सांगितले जात आहे,सरपंच ग्रामसेवक आणि इंजिनियर यांच्या संगनमताने दुबई पुणे येथे कामास असलेल्या मजुरांची बोगस नावे टाकून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकिस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या भ्रष्ट कामाची तात्काळ चौकशी करावी असे मागणी खरोसा ग्रामस्थांनी केली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की खरोसा येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जाधव यांनी संबंधित विभागाला दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायत या अंतर्गत गावात सात किलोमीटर रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यासाठी तब्बल 84 लाख रुपये निधी झाला आहे. विशेष म्हणजे एका किलोमीटरला बारा लाख रुपये याप्रमाणे सात किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात येणार होते परंतु सरपंच महाशय आणि ग्रामसेवक यांनी संबंधित अधिकारी इंजिनियर यांच्याशी संगणमत करून डांबरीकरण व सिमेंटकरण करण्याऐवजी केवळ गावाशेजारी असलेल्या डोंगराचे मुरूम रस्त्यावर टाकून अवघ्या चार लाखात रस्ते काम गुंडाळले आहे आणि तब्बल 80 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे विशेष म्हणजे हे सर्व काम मजुराद्वारे करून घ्यायचे होते या कामावर त्यांनी दाखवलेले मजूर आज रोजी त्यापैकी 17 दुबई येथे तर काहीजण पुणे शहरात कामास आहेत असे असतानाही त्यांचे बोगस नावे लाखो दाखवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे हे सर्व काम जेसीबी मशीनद्वारे करून प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांच्या पोटावर मात्र यांनी पाय दिला असून केवळ चार लाखांमध्ये शहरातील सात किलोमीटर चे रस्ते गुंडाळे आहे. तरी या सर्व कामाचे तात्काळ चौकशी करून सरपंच ग्रामसेवक आणि संबंधित इंजिनियर यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिगंबर जाधव यांच्यासह खरोसा गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.