शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सा.ज्ञानांकुशचा नवदुर्गा पुरस्कार 2024 अंजुम इकबाल शेख यांना प्रदान.*

 *शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सा.ज्ञानांकुशचा नवदुर्गा पुरस्कार 2024 अंजुम इकबाल शेख यांना प्रदान.*




औसा(प्रतिनिधी)विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या सा.ज्ञानांकुशने मागील पाच वर्षापासून नवदुर्गा पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली.विविध क्षेत्रात विशिष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा नवरात्री उत्सवाच्या दरम्यान नवदुर्गा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला जातो.यावर्षी या निमित्ताने निवड समितीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवदुर्गा पुरस्कारासाठी प्राचार्य अंजुम इकबाल शेख यांची निवड केली.मागील पंधरा वर्षापासून विविध संस्थानात ज्ञानदानाचे कार्य केलेल्या आणि सध्या महिला शिक्षकांना सोबत घेऊन लहान लेकरांचे भविष्य घडवीणाऱ्या ऑर्बीट प्री-प्रायमरी स्कूल च्या माध्यमातून प्राचार्य म्हणून अंजुम शेख या सेवा बजावत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यावर्षी सा.ज्ञानांकुशच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सहशिक्षिका पठाण तहेनियत,मुस्कान शेख,तरंन्नूम पटेल,सालेहा शेख,आयेशा शेख,अश्विनी वायाळ,जमादार सानिया,फरिसा शेख,सानिया पटेल,सिमा मणियार,सा.ज्ञानांकुश चे संपादक वामन अंकुश, ऍड.इकबाल शेख,उमर शेख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या