हि निवडणूक अभिमन्यू च्या नाहीतर जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यू पवारांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित याचा मला अभिमान आहे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी...

 हि निवडणूक अभिमन्यू च्या नाहीतर जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी 



संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यू पवारांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित याचा मला अभिमान आहे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी... 









किल्लारी - राजकारणात जनता मालक तर लोकप्रतिनिधी सेवक आहे. म्हणून आपण लोकांची सेवा करायची आहे. त्यांचे जीवन सुसह्य करायचे आहे. येथील आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलायची आहे. गाव, गरिब, मंजूर, शेतकऱ्यांचे कल्याण करायचे आहे. याची सतत मनामध्ये अस्वस्थता ठेवणारा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यू पवारांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे त्याचा मला आनंदही आहे आणि अभिमानही त्यामुळे हि निवडणूक अभिमन्यू पवार यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही तर हि निवडणूक खऱ्या अर्थाने येथील जनतेच्या भविष्याच्या फैसला करणारी निवडणूक असल्याचे भाकित केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.


महायुती चे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ किल्लारी येथे (दि.१२) रोजी आयोजित सभेत नितीन गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, माजीमंत्री बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, सुरेश बिराजदार, लक्ष्मण भोसले, संताजी चालुक्य, मुक्तेश्वर वाघदरे, संतोषप्पा मुक्ता, सुभाष जाधव,सुनील उटगे, ज्ञानेश्वर वाकडे,दत्तात्रय कोळपे,सभापती वामन, उपसभापती भिमाशंकर राचट्टे, किरण उटगे, सुधीर पोतदार, सरपंच सुलक्षणा बाबळसुरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी बोलत होते की. २०१० साली उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देण्याची मला संधी मिळाली होती तो उत्कृष्ट कार्यकर्ता आजचे आमदार अभिमन्यू पवार असून त्यावेळी मी अभिमन्यू पवार हे चांगले कार्यकर्ते व नेते होणार म्हणून सांगितले होते.कर्तृत्व, नेतृत्व व वक्तृत्व या गोष्टी राजकारणात महत्त्वाच्या आहेत पण त्यापेक्षाही जनतेच्या समस्याची जाण असणे आणि केवळ जाण असून चालत नाही तर ज्या समस्या आहेत. त्या कशा सोडवायच्या त्याचे हे एक तंत्र आहे. आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांनी एवढे उत्कृष्ट काम केले आहे. उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे आपला आमदार हा उत्तम कार्यकर्ता आहे. सर्व सामान्यांशी उत्तम संबंध जोडणारा आहे. आणि पाणंद रस्त्यापासून हायवे पर्यंत, जलसंधारण पासून विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर अध्यापन करून जनतेला जास्तीत जास्त विषयावर कसे काम करता येईल याकरिता सातत्याने काम करणारा आहे. राजकारणाचा अर्थ सत्ताकारण नाही राजकारण म्हणजे शिक्षण, आरोग्य क्षेत्रात लोकांची सेवा करणे, विकास करणे आहे आणि खऱ्या अर्थाने हेच खरे समाजकारण आहे. तेच समाजकारण आहे. जात, धर्म व पंत यापलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य, सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास या आधारावर काम करतात गोरगरिबांची सेवा करतात, उत्तम मानवी संबध जोडतात त्या सर्व लोकप्रतिनिधी मध्ये अभिमन्यू पवार यांनी नाव कमवले आहे याचा मला आनंद आहे. 


निवडणूकीत तुम्हाला तुमचे चांगले भविष्य घडविणारे उमेदवार मिळाला तरच तुमचे भविष्य बदलू शकते. जी पार्टी व जो नेता तुमचे भविष्य बदलू तो अभिमन्यू च्या रुपाने उभा आहे आणि तुम्ही चांगल्या उमेदवाराच्या मागे उभे राहिलात तर या भागाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. जेव्हा विकासावर बोलता येत नाही तेंव्हा लोकांना कन्फ्युज करण्याचे काम केले जाते. लोकसभेत आशा प्रकारे भाजप च्या संदर्भात चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरविण्याचे काम काॅग्रेसने केले. दलित व मुस्लिम समाजात संभ्रम व भिती निर्माण करण्याचे काम करण्यात आले. ज्या काॅग्रेस पार्टीने घटना तोडण्याचे काम केले आज तेच घटना घेऊन फिरत आहेत अशी टीका यावेळी काॅग्रेसवर करित खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र काळापासून ग्रामीण रस्ते विकासाचे काम केले असते तर शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व दुध शहरात विक्रीसाठी घेऊन जाता आला शेतकरी आर्थिक समृद्ध झाला असता तर शेतकरी आत्महत्या कशाला झाल्या असत्या हे सोडून तत्कालीन काँग्रेस सरकारने तेव्हा केवळ कंपन्या उभारण्याचे काम केले त्या सर्व पुन्हा डबघाईला आले असे यावेळी बोलताना गडकरी म्हणाले तसेच या १० वर्षांच्या काळात सरकारची सर्वात मोठी उपलब्धा शेतकऱ्यांना अन्नदाता नाही तर ऊर्जादाता म्हणून पुढे आणून केले असून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व गाव विकासाला चालना देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.. 


......................... 


औशाच्या विकासाला लागेल तेवढा निधी देतो 



आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणात औशाच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी केली होती. यावर बोलताना नितीन गडकरी यांनी अभिमन्यू तुम्ही निवडून आल्यावर तुम्हाला औशाच्या विकासासाठी शेकडो नाहीतर हजारो कोटींचा निधी देतो. बायपास काय राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देतो असे आश्वासनही यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिले. 



............................... 


विकास पाहण्यासाठी औशाच्या पवारांकडे जनता येईल - आ अभिमन्यू पवार. 



या पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असून त्या माध्यमातून मतदारसंघात शेतरस्ते, सिंचन क्षेत्र वाढविणे,दर्जेदार शैक्षणिक सुविधा विकासकामे पूर्ण केली जात आहेत तर एमआयडीसी च्या माध्यमातून उद्योगाला चालना व रोजगार निर्मिती आदी कामे हाती घेण्यात आले असून येणाऱ्या काळात चारशे किलोमीटरपेक्षा अधिक लाबींचे शेतरस्त्यांचे डांबरीकरण करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची विकासकामे पूर्ण होणार असताना विकास पाहण्यासाठी राज्यभरातून औशाच्या पवारांकडे लोक येतील असा विश्वास यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या