जिद्द -चिकाटी असल्या
स यश हमखास मिळते- डॉ शहेबाज उस्मानी*
*जाहेदा बेगम उर्दू शाळेचा स्नेहसंमेलन संपन्न*
लामजना- जग नवनवीन तंत्रज्ञानासह पुढे आगेकूच करत आहे. अशावेळी नव्या तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त करणे हे गरजेचे बनले आहे. याबरोबरच जिद्द आणि चिकाटी असल्यास यशाचे शिखर गाठता येते, असे मत डॉ. शहेबाज उस्मानी यांनी वयक्त केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहेदा बेगम उर्दू प्रा शाळा लामजना या संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट म. सामियोंद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मेहनती चा काळात कोणावर अवलनंबुन राहु नका कारण खुप वेळा सर्वात मोठे यश खुप मोठ्या निराशयेंनंतरच प्राप्त होते.माझी माती माझा देश जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण सुद्धा करू शकता.असे मत ते या वेळी व्यक्त केल्या .
सध्या विविध क्षेत्रांमध्ये कौशल्यपूर्वक शिक्षणानंतर अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी प्राप्त करताना अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण वेळ आणि जिद्द चिकाटी बाळगून पुढे मार्गक्रमण केल्यास निश्चितच उज्वल भविष्य साकारले जाऊ शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी काही वर्षासाठी मेहनत घेतल्यास यशस्वी जीवन जगता येणार असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगान, मनोरंजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवितानाच भारत देशाची एकता, अखंडता टिकविणे आणि मोबाईल, सोशल माध्यमांचा होत असलेला भडीमार, तरुणांमधील व्यसनाचे सवयी यावर जनजागृती करून उपस्थित सर्वांची दाद मिळविली. सुमारे १०० विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने ट्राफी , मिडल ,गौरव प्रमाण पत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला त्या वेळी उपस्थित असलेले मान्य वर डॉ शहेबाज उस्मानी. एडवोकेट समीयोदीन पटेल. एस एम, पटेल. बी एम.पटेल मुजीब सर व मुख्यध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक काझी सर, सूत्रसंचालन शिक्षिका शेख वहिदा यांनी तर आभार शिक्षिक चांद सर यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.