मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेचा राजकीय पक्ष हे महत्वाचा भाग आहेत. त्यामुळे मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरीक्षण आणि अद्ययावतीकरण याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी पंकज मंदाडे यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मतदार यादीचे पुनरीक्षण व अद्ययावतीकरण, मतदारांचे फोटो, समान नावाच्या मतदारांचे पूर्ण नाव, मयत मतदारांची नावे वगळणे यासारख्या विविध मुद्द्यांवर राजकीय पक्ष प्रतिनिधी यांनी आपल्या सूचना मांडल्या.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या