जिल्ह्यात गत 24 तासात 23.25 मि.मी. पावसाची नोंद





जिल्ह्यात गत 24 तासात 23.25 मि.मी. पावसाची नोंद
 
हिंगोली,दि.29: जिल्ह्यात दि. 29 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 23.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.65 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 202.09 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 23.51 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दि. 29 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात  (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली-4.29 (195.87) मि.मी., कळमनुरी-1.00 (155.99) मि.मी., सेनगांव-6.50 (243.21) मि.मी., वसमत-2.71 (151.87) मि.मी.,  औंढा नागनाथ-8.75 (263.50) मि.मी., पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आज अखेरपर्यंत सरासरी 202.09 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****
 
                                                   
 
औंढा तालुक्यातील भोसी व कळमनुरी तालुक्यातील बाभळी गाव कंटेनमेंट झोन घोषित
 
        हिंगोली,दि.29: औंढानागनाथ तालुक्यातील मौ. भोसी आणि कळमनुरी तालुक्यातील मौ. बाभळी या गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून मौ. भोसी व मौ. बाभळी या गावाचे संपूर्ण क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****
 
                                                         
इजिमा-35 रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात
·   सार्वजनीक बांधकाम विभागाकडून खुलासा
 
हिंगोली,दि.29 : एका दैनिक वृत्तपत्रात दि. 27 जून, 2020 रोजी ‘पुल वाहून गेला 25 गावांचा वांधा, हिंगोली तालूक्यातील वसईतील घटना मराठवाड्यात पाऊस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले आहे. तसेच यामध्ये ‘मृग नक्षत्रातील पावसाने वसई येथील पुलाच्या बाजूची माती खचली होती. त्याकडे सार्वजीनक बांधकाम विभागाने दूर्लक्ष केल्याचे म्हटले आहे’.
परंतू सदर रस्ता औंढा नागनाथ तालुक्यातील रस्ते विकास आराखडा 2001-2021 नुसार इजिमा-35 दर्जाचा असून हा रस्ता प्ररामा-7 वर चिखलवाडी -समगा-धामणी-वसई-पूर-कंजाळा-जामगव्हाण रामा 257 ला मिळणारा आहे. तसेच सदर इजिमा-35 हा रस्ता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसून कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे वृत्तपत्रात प्रसध्द बातमीत सदर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद (बांधकाम) हिंगोली यांच्याकडे असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या