बोगस बियाने देणार्या कंपन्यावर गुन्हे दाखल करून शासनाने
शेतकर्याला एकरी 25 हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी
लातूर तालुक्यातील गावांचा पाहणी दौरा : माजी आ.कव्हेकर यांची शासनाकडे मागणी
लातूर दि.25/06/2020
जिल्ह्यातील लातूर, रेणापूरसह निलंगा, अहमदपूर, चाकूर ,शिरूरअनंतपाळ या भागातील शेतकर्यांनी आपल्या शेतात कृषी दुकानदारांकडून नामांकित कंपन्याचे सोयाबीन बियाणे खरेदी करून आपल्या शेतात त्या बियाण्याची पेरणी केली. पेरणीला आठवडा उलटला तरी बियाण्याची उगवण झालीच नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. ही परिस्थिती लक्षात येताच माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर तालुक्यातील सारसा, वांजरवाडा या गावातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी त्यांना महाबीज व अॅग्रोटेक या कंपन्यासह अनेक कंपन्याची बियाणे बोगस निघालेले आहे. त्यामुळे या प्रश्नांची दखल घेवून आम्हाला न्याय द्यावा,अशा भावनाही शेतकर्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी याबाबत शासनाकडे पाठपूरावा करून अॅग्रोटेक व महाबीज या कंपन्यासह बोगस बियाणे निर्माण करणार्या कंपन्याची सखोल चौकशी करून दोषी कंपन्यावर गुन्हे दाखल करून शेतकर्याला एकरी 25 हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी. यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कृषी मंत्री दादाजी भूसे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे पाठपुरवा करू, असे आश्वासनही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिले.
यावर्षी जुनच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस झालेला आहे.त्यामुळे शेतकर्यांनी पेरण्या लवकर केलेल्या आहेत.परंतू सातदिवस झाले तरी सोयाबीन बियाण्याची उगवणच झालेली नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. बोगस बियाण्याबाबत अनेक शेतकर्यांनी दुकानदाराकडे तक्रारी केलेल्या आहेत.तसेच सदरील सोयाबीन बियाणे खरेदीच्या पावत्याही दाखविलेल्या आहेत. परंतू सदरील दुकानदार हा सर्व प्रकार कंपणीवर ढकलून शेतकर्याच्या नुकसानीला बगल देत आहेत.अगोदरच कोरोना संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर हे दुहेरी संकट आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर तालुक्यातील सारसा येथे गोवर्धन भिसे व उध्दव तांबारे या शेतकर्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. व शेतकर्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासमवेत जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, लातूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, उपाध्यक्ष बब्रुवान पवार, महादेव गावकवाड, नेताजी नानजकर, बाबूराव पठाण, आयुब बेग, गोपीनाथ तांबारे, अनिल चव्हाण, अशोक आडसूळ, सुनिल भिसे, धोंडीराम पवार, ज्यातीराम पाडे, वसंत भिसे, पोपट भिसे, दगडू डिगे यांच्यासह शेतकर्यांची उपस्थिती होती.
कृषी अधिकार्यांकडे तक्रार करा, मदतीसाठी पाठपुरावा करू ..
सारसा येथील शेतकर्यांच्या सोयाबीनचे बीयाणे उगवले नसल्याने शेतकर्यांचे 50 टक्के शेतकर्यांचे नुकसान झालेलेे आहे. परिनामी शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकर्याच्या समक्ष अतिरिक्त जिल्हा कृषी अधिकारी श्री.कदम यांना शेतकर्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली. नुकसान झालेल्या शेतकर्यांमध्ये गोवर्धन भिसे,कांचन भिसे, संपत भिसे, आश्रुबाई झाडकर, सर्जेराव भिसे, मारोती भिसे, कौशल्या भिसे, चतुर्भुज भिसे, नानासाहेब भिसे, किसन भिसे, मोहन भिसे, गोविंद तांबारे, सुहास पवार, नारायण पवार, बब्रुवान पवार, रेश्मा पवार, आदींचा समावेश आहे. यांच्याकडे सदरील बोगस बियाण्याच्या पावत्याही होत्या. त्या पावत्या जोडून तालुका कृषी अधिकार्यांकडे तक्रार द्या. आपण मदतीसाठी पाठपूरावा करू, असे आश्वासन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी उपस्थित शेतकर्यांना दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.