महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेची मुख्यमंत्री कोरोना
सहाय्यता निधीसाठी ४३ हजारांची मदत सुपुर्द
लातूर,दि.२४ः मानव जातीवर ओढवलेले संकट,कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अतिशय चिवट व धिरोदात्तपणे अहोरात्र झटत असून, त्यांच्या मानवतावादी कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेने आपला खारीचा वाटा म्हणून ४३ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश,मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्याकडे सुपुर्द केला.
देशासह महाराष्ट्रात जीवघेणा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो असून,महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकार हे प्रयत्नांंची पराकाष्टा करत आहे.याकामी समाजातील विविध पक्ष,संस्था,संघटना,उद्योजक आणि दानशूर लोक पुढे येत आहेत.अशा वेळी आपलीही सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्रातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक,अभ्यासक आणि विद्याथ्यार्ंमध्ये तात्विक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांची मुक्तपणे चर्चा घडवून आणणार्या महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.नागोराव कुंंभार, कार्याध्यक्ष डॉ.सुनीलदत्त गवरे,कार्यवाह डॉ.जी.एम.उपाडे, उपाध्यक्ष डॉ.मोहन देशमुख व अन्य पदाधिकार्यांनी पुढाकार घेवून,खारीचा वाटा उचलावा म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोरोना-१९ साठी ४३ हजार रुपयांची निधी संकलीत केला.
सदरील ४३ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यंाच्याकडे महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अमन बगाडे,कोषाध्यक्ष डॉ.मोहन देशमुख,डॉ.नागेश शेळके व प्रा.गणेश निमसे यांनी सुपुर्द करण्यात आला.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.