मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक काब्रिस्तान मध्ये नालीचे घाण पाणी येऊन होत असलेली विटंबना थांबवा, अन्यथा नगर पालिका अशुद्धीकरन आंदोलन करणार- समस्त मुस्लीम बांधव*




*मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक काब्रिस्तान मध्ये नालीचे घाण पाणी येऊन होत असलेली विटंबना थांबवा, अन्यथा नगर पालिका अशुद्धीकरन आंदोलन करणार- समस्त मुस्लीम बांधव*

निलंगा नगर परिषद अंतर्गत शिवाजी नगर, प्रभाग 5, वार्ड 16 मधील सार्वजनिक मुस्लिम काब्रिस्तान मध्ये शहरातील नालीचे घाण पाणी येऊन अस्वच्छता व मुस्लिम समाजाची होत असलेली विटंबना त्वरित थांबवा व काब्रिस्तनाचे राहिलेले काम त्वरीत पूर्ण करावे अन्यथा दि-6 जुलै रोजी समस्त मुस्लिम समाजातर्फे नगर पालिका अशुद्धीकरण आंदोलन करण्यात येईल यास समस्त नगर पालिका व प्रशासन जबाबदार राहील. अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजातर्फे उपविभागीय अधिकारी यांना मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
    यावेळी मुजीब सौदागर, इस्माईल शेख,मुजम्मील कादरी,झारेकर मज्जीद,शेख शादुल,शेख हुसेन, उमर फारुख औसेकर,महेबूब बागवान,नसीम तांबोली, शेख सोहेल,चांद शेख,इस्माईल तांबोली आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या