हिंगोलीत सन्मती उद्यानाचे उद्घाटन व वृक्षारोपण हिंगोली: इमामोदिन इशाती





हिंगोलीत सन्मती उद्यानाचे उद्घाटन व वृक्षारोपण
हिंगोली: इमामोदिन  इशाती
 प्रभाग क्र. १ सन्मती कॉलनीमध्ये २८ जून रोजी सन्मती उद्यानाचे उद्घाटन व वृक्षारोपन न.प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
सन्मती कॉलनीतील नागरिकांनी आपल्या भागात असलेल्या ओपन स्पेसची जागा स्वखर्चातून लेवल करून घेतल्यानंतर २८ जून रोजी सन्मती उद्यानाचे उद्घाटन व वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी न.प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, महेंद्र धबाले यासह प्रशांत घुगे, सुधाकर बल्लाळ, वसंतराव मोरे, दत्तराव क्षिरसाट, पांडुरंग शिंदे, सुधीर गोगटे, किशन पवार, संतोष जाधव, सागर सोनटक्के, सौ. कुलकर्णी, वसुंधरा घ्यार, पंचशिला जावळे, माधुरी बांगर, विमल घुगे, गोविंद कोरडे, श्री तायडे, माधव खोडके, दिलीप इडोळे, संजय घुगे, प्रियंका इडोळे, सौ. कांताबाई, रमेश तोटालु, सौ. गंगासागर बल्लाळ, संतोष लोंढे, गोरेताई, शितल पवार यासह सन्मती कॉलनीतील नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिकांनी या उद्यानातील एक एक वृक्ष दत्तक घेऊन संगोपनाचा संकल्प केला. कार्यक्रमात दिलीप चव्हाण यांनी बोलतांना ओपन स्पेस विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. केशव वाबळे यांनी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून वृक्षारोपना नंतर त्याचे संगोपनही करावे असे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या