६४ व्या जयंतीनिमित्त ६४ वृक्षांचे रोपण करून मित्राला आगळी वेगळी आदरांजली
रजनीगंधा फाउंडेशन, हॅप्पी मॉर्नीग ग्रुप, ग्रीन लातूर वृक्ष टिम यांचा संयुक्त उपक्रम
लातूर शहरातील प्रसिध्द ह्रदयरोग व मधुमेह तज्ञ स्व. डॉ. रवीशंकर चवंडा यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्ताने बार्शी रोड वरील चवंडा हॉस्पीटल ते साई मंदीर रस्ता दुतर्फा ६४ मोठी झाडे लावण्यात आली. आकाशमोगरा, कडुनिंब, बकुळ, गौरीचंदन अशी सावली देणारी व फुलांचा बहर येणारी पर्यावरणपुरक झाडे लावण्यात आली.
यावेळी राजपाल माने, डॉ. नवाब जमादार, डॉ. शरद पाटील, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. अजित जगताप, डॉ. चिंते, महादेव साबदे, सुरेश मालू, रमेश कलंत्री, डॉ. सतिश हंडरगुळे, डॉ. शाम सांगळे, चंदूलालजी बलदवा, विनोद गिल्डा, डॉ. संगमेश चवंडा उपस्थित होते. वृक्षारोपणाकरीता ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, नागेश स्वामी, ॲड. वैशाली लोंढे, प्रमोद निपानीकर, मनमोहन डागा, रुषिकेश दरेकर, जफर शेख, हितेश डागा, मिर्झा मोईझ, सिताराम कनजे, सुलेखा कारेपुरकर, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार, शैलेश सुर्यवंशी, डॉ. मुश्ताक सय्यद, कल्पना फरकांडे, पुजा निचळे, स्वाती यादव, प्रफुल्ल पाटिल यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.