जिल्हयात सरासरी 19.45 मि.मी. पावसाची नोंद





जिल्हयात सरासरी  19.45  मि.मी. पावसाची नोंद

 

 लातूर दि.29-(जि.मा.का.) जिल्हयात आज दिनांक 29 जून  2020 रोजी सकाळी  8 पर्यंत सरासरी 19.45 मिमी पावसाची नोंद झाली असून  आज पर्यंत झालेला पाऊस  हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या  26.39 टक्के झाला असल्याची माहिती  जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्हयात दिनांक 29 जून 2020 रोजी झालेले  तालुका निहाय  पर्जन्यमान तसेच 1 जून ते 29 जून 2020 पर्यंत झालेले एकूण  पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. ( आकडेवारी मि.मी.मध्ये ) लातूर (14.75, 218.41) , औसा (6.00, 179.72) , रेणापूर (28.25, 218.50) ,अहमदपूर (14.83, 242.82) , चाकूर-(20.20, 158.40) , उदगीर-(18.86,202.72),जळकोट-(2.50,216.50), निलंगा-(19.13, 177.18),देवणी- (32.67. 261.68)  व   शिरुर अनंतपाळ- (37.33, 213.34) मि.मी. आहे.

लातूर जिल्हयाची 1 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 791.60 मि.मी. असून आजपर्यंत झालेला पाऊस 130.89 टक्के इतका असून वार्षिक सरासरीच्या 26.39  टक्के आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या