कुक्कुट पालन व्यवसायातुन आर्थिक उन्नती शक्य मुख्यकार्यकारी अधिकारी -संतोष जोशी





कुक्कुट पालन व्यवसायातुन आर्थिक उन्नती शक्य
   मुख्यकार्यकारी अधिकारी -संतोष जोशी

 

 लातूर दि.29-(जि.मा.का.) पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती उदगीर अंतर्गत सन 2018-19 या वर्षात निवड झालेले कल्लूर ता.उदगीर येथील लाभार्थी बालाजी अर्जून कल्लुरकर यांच्या कुक्कुट प्रकल्पास जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी नुकतेच भेट दिली. त्यावेळी त्यांनी  कुक्कुट पालन व्यवसायातून आर्थिक उन्नती शक्य असल्याचे प्रतिपादन केले.

श्री.कल्लूरकर यांनी एक वर्षापुर्वी हा व्यवसाय चालू केला असून आजपर्यंत बॉयलर पक्ष्याच्या तीन बॅच विक्री केल्या असून त्यांना पहील्या बॅचमध्ये रु. 45 000/- दुसऱ्या बॅचमध्ये रु. 60,000/- व तिसऱ्या बॅचमध्ये रु. 30,000/- याप्रमाणे निव्वळ नफा झाला असून चौथी बॅच विक्रीस तयार आहे. यात रु. 60,000/- असा एकूण  2 लाख रुपये नफा मिळाला असल्याचे बालाजी कल्लुरकर यांनी सांगितले.

या भेटीच्या वेळी गटविकास अधिकारी अंकुशराव चव्हाण, पशुधन विकास अधिकारी  डॉ.सतीश केंद्रे व पशुधन पर्यवेक्षक जी.पी. आमगे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या