सम्राट अशोक वाचनालय म्हणजे लातूरच्या पूर्व भागाचे ज्ञान भांडारःरघुनाथ बनसोडे
लातूर,दि.२७ः लोकराजा शाहू महाराज व अन्य महापुरुषांनी समाजाला ज्ञान,शिक्षण देण्यासाठी कष्ट घेतले म्हणून सामान्यांना शिक्षण मिळत होते,असे सांंगून,लातूरचा पूर्व भाग तसा उपेक्षित घटकांचा असला तरी या घटकांना,स्पर्धा परीक्षार्थींना ज्ञानसंपन्न करण्यासाठी सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालय हे ज्ञान भांडार खुपच उपयुक्त असल्याचे मत माजी नगरसेवक ,दै.प्रभातचे संपादक रघुनाथ बनसोडे यांनी व्यक्त केले.
सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयाच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील विस्तारीत वाचन कक्ष-अभ्यासिकेत शुक्रवार,दि.२६ जून २०२० रोजी लोकराजा शाहू महाराज जयंती निमित्त शारीरिक अंतर राखून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ बनसोडे बोलत होते. या कार्यक्र्रमाच्या अध्यक्षपदी भाजपा नेते व्यंकटराव पनाळे हे होते.प्रारंभी लोकराजा शाहू महाराज यंाच्या प्रतिमेचे पूजन करुन सामूहिक अभिवादन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष व पाहुण्यांचे ग्रंथ व गुलाबपुप्प देवून स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना रघुनाथ बनसोडे म्हणाले की, आजच्या संकुचित,अभ्यास नसलेल्या सरकारमधील कारभार्यांमुळे ज्ञानाचा प्रसार आणि संवर्धन करणार्या सार्वजनिक ग्रंथालयांंसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून, कर्मचार्यांचे भवितव्यही अंधारमय आहे.शासनाने ही संकुचित वृत्ती बदलण्याची गरज आहे. म.फुले,महाराज सयाजीराव गायकवाड,शाहू महाराज,बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी शिक्षण आणि ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व दिले आहे.शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेवून कारभार केला.त्याचा विसर पडता काम नये असे सांगून,आजच्या राज्यकर्त्यांनी हा देश ,राज्य नीट चालवयाचे असेल तर शाहू महाराज आत्मसात केला पाहिजे, या वाचनालयाचा परिसरासाठी अत्यंत उपयोग आहे, त्याच्या वाढीसाठी आम्ही सोबत असल्याचे असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले.
लोकराजा शाहू महाराजांची ज्ञान प्रसारासाठी धन देवू केले.आंतरजातीय विवाहाचा आरंभ आपल्या घरापासून केला.सर्वसामान्यांची दुःखे त्यांच्यात मिसळून जाणून घेवून आधार दिला. बाबासाहेबांच्या चळवळीला हत्तीचे बळ दिले.महापुरुषांच्या विचारांची कास धरुन हे वाचनालय वाटचाल करतेय,त्यांला माझा सदैव पाठिंबा राहिल,अशा शब्दात व्यंकटराव पनाळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिव बी.जी.होळीकर यंांनी केले. ग्रथपाल अंजुषा काटे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला लिपीक संकेत होळीकर, किसनराव कांबळे गुरुजी, कवी प्रदीप कांबळे,नितीन चालक, आगवाने आदी वाचक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.