आ. अभिमन्यूजी पवार यांच्या हस्ते दुर्वा हर्बल फूडचे उद्घाटन






आ. अभिमन्यूजी पवार यांच्या हस्ते दुर्वा हर्बल फूडचे उद्घाटन.. 

 


लातूर - इलयास चौधरी
लातूर शहरात सुरू करण्यात आलेल्या प्रोडक्ट दूर्वा हर्बल फूड चे उदघाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले लाॅक डाऊन काळात हाती घेतलेल्या मोदींजींनी आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या माध्यमातून व वाटाड्या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेवून या गृहउद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी हा लघु उद्योग शेटे कुटुंबातील लोकांनी हा लघुउद्योग उभारला असून याची प्रशंसा आ.पवार यांनी केली. 


यावेळी.सुहासजी पाचपुते, विकास कुलकर्णी, किरण कुलकर्णी, डॉ.लकडे, राघवेंद्र ईटकर, डॉ.टेकाळे,केतन शेटे व शेटे परिवारातील सर्व सद्स्य उपस्थित होते.यावेळी आ. अभिमन्यूजी पवार यांनी या लघु उद्योगाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या