औसा शिक्षक पतसंस्थेच्या सभासदाना डिजिटल संगणक स्लीपचे ऑनलाईन वाटप
औसा : इलयास चौधरी
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने गेल्या १२ वर्षापासून अखंडित सभासदांना लाभांशासोबत दरवर्षी ऑक्टोबर / नोव्हेंबर महीन्यात संगणक स्लीपचे वाटप करण्यात येत होते परंतु कोविड-19 या संसर्गजन्य साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी एकाचवेळी सर्व सभासदांना डिजिटल संगणक खाते उतारे आज दि. २७/०६/२०२० रोजी मान्यवरांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सोशल मिडिया मार्फत ऑनलाईन वाटप करण्यात आले.
औसा पंचायत समितीतील शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी डी. के. कुलकर्णी, जवळगा केंद्राचे केंद्रप्रमुख नरसिंग घोडके हे सेवानिवृत्त झाल्यामुळे व शिक्षण विभागाचे नूतन प्रशासन अधिकारी विजयकुमार राठोड यांचा सर्वप्रथम पतसंस्थेच्या वतीने पुस्तक देवून सत्कार करण्यात आले. औसा शिक्षक पतसंस्था सन 2007-08 पासून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यास सभासदांनी वर्षभरात संस्थेशी केलेल्या व्यवहाराचा म्हणजे भागभांडवल, दीर्घ आकस्मिक कर्ज मुद्दल, कर्ज व्याज, कर्ज येणेबाकी रक्कम, आर. डी., कर्ज जीवन हमी रक्कमेचा सविस्तर तपशील असलेली संगणक स्लीप सभासदांना प्रत्येक्षात हातात वाटप करण्याचा उपक्रम राबवित आहे. यावर्षी संपूर्ण जगात सुरू असलेल्या कोविड-19 चा विचार करून पतसंस्थेने सभासदांच्या सोयीसाठी, संस्थेचा कसलाही खर्च online software साठी न होऊ देता आर्थिक वर्ष संपल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात डिजिटल संगणक खाते उतारा डिजिटल स्वाक्षरीसह एकाचवेळी सर्व सभासदांना त्यांच्या मोबाईलवर सोशल मिडिया मार्फत पाठविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पारदर्शक कारभार सभासदासमोर मांडला आहे.
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने सभासदांच्या सोयीसाठी व हितासाठी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये पतसंस्थेचे संगणकीकरण, सुशोभीकरण, इमारत विस्तारिकरण, कर्ज मर्यादा 10 लाख, व्याजदर 10.50%, लाभांश 9%, सण अग्रीम कर्ज 6% दराने, आर.डी व मुदत ठेव 10% दराने, जीवन-कर्ज हमी योजना, असे अनेक उपक्रम व योजना राबविल्या त्यामुळेच औसा शिक्षक सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र शासनाचा सहकार विभागाचा "सहकार निष्ठ पुरस्कार" प्रदान झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक संजू रोडगे, प्रास्ताविक सचिव संजय जगताप तर अध्यक्षीय भाषण चेअरमन महादेव खिचडे यांनी केले व आभार संचालक दिपक डोंगरे यांनी मानले. यावेळी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.