१० हजार वह्या
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचा उपक्रम
लातूर दि.१०.- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी गरजू गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी १० हजार वह्या देण्याचा निर्णय घेवून संबंधित पक्ष पदाधिकार्यांकडे वह्या सुपूर्त केल्या.
अडचणीत, संकटात सापडलेल्या सर्व सामान्यांना गोरगरीबांना आरोग्य सेवेसह सतत वेगवेगळ्या प्रकारची मदत करणारे भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी कोरोनाच्या संकट काळात लातूर शहर आणि परिसरात लॉकडाऊनमूळे अडचणीत सापडलेले गोरगरीब, निराधार, अपंग रुग्णांचे नातेवाईक यांच्यासह शालेय विद्यार्थी यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो जेवणाचे डब्बे त्यांच्यापर्यंत पोहचवून मोठा दिलासा दिला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणार्या गोरगरीब आणि गरजु शालेय विद्यार्थ्यांसाठी १० हजार वह्या देण्याचा निर्णय भाजपाचे जिल्हाधक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी घेतला. सदरील वह्या मतदार संघातील भाजपा पदाधिकार्यांकडे सुपूर्त करून येत्या ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना वाटप कराव्यात अशा सुचना दिल्या.
प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त दि. १० जून बुधवार रोजी आ. रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय काळे, विधानसभा प्रमुख अनिल भिसे, रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, भैरवनाथ पिसाळ, वसंत करमुडे, राजकिरण साठे, विनायक मगर, रेणापूर नपचे दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, शंकर चव्हाण, सचिन लटपटे, मारुती गालफाडे, श्रीकांत सुर्यवंशी यांच्याकडे सदरील वह्या सुपूर्त केल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.