चिनी राष्ट्राचा व चिनी मालाची होळी १७.६.२०२० रोजी मनसे व प्रभराज प्रतिष्ठाण लातूर च्या वतीने संभाजी नगर परिसरात चिनी राष्ट्राचा व चिनी मालाची होळी करून निषेध करण्यात आला






चिनी राष्ट्राचा व चिनी मालाची होळी
१७.६.२०२० रोजी  मनसे व प्रभराज प्रतिष्ठाण लातूर च्या वतीने संभाजी नगर परिसरात चिनी राष्ट्राचा व चिनी मालाची होळी करून निषेध करण्यात आला.
   भारताबरोबर सवयीप्रमाणे पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनने परत एकदा विश्वासघात करून भारतीय सीमेवर घुसखोरी केल्यामुळे झालेल्या संघर्षामध्ये २० भारतीय जवानांना वीर मरण आले.त्यामुळे संपूर्ण भारतदेशामध्ये चीन देशाबद्दल संतापाची लाट  निर्माण झाली  त्यामुळे चिनी बनावटीच्या वस्तू वर सर्व भारतीय जनतेने बहिष्कार घालून आपण ही देशाचे देने लागतो या भावनेतून चीनचा सर्व स्तरावर निषेध करून आपण सर्व जनता देशाच्या  पाठीशी खांभिर पणे उभे आहोत चीनला ही चोख प्रातिउत्तर द्यावे तसेच भारत माता की जय... वंदे मातरम... शहीद जवान अमर रहे ...च्या घोषणा देत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.यावेळी
    मनसे शहर संघटक  अँड.अजय कलशेट्टी, शिवसेना उपशहर अध्यक्ष विष्णुपंत साठे,अँड.सुरेश सलगरे,दीपक सगर,विष्णू गुरुडे,गोपाळ कुलकर्णी,संतोष पतंगे,गोपाळ खंडागळे, साई रासे,राहुल शिंदे,पांडुरंग बेंबडे,आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या