रीचर्डसन क्रूडास कोविंड केअर सेंटरची
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून पाहणी
मुंबई, दि. 17 :
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज मुंबईतील भायखळा येथील रीचर्डसन क्रूडास कंपनीच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकांमार्फत उभारण्यात येत असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे. या कोविड सेंटरचे दोन भाग करण्यात आले असून सेंटर वन येथील डेडिकेटेड हेल्थ सेंटर मध्ये 300 रुग्णांसाठी ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयसीयु ची गरज नसणारे रुग्ण येथे उपचार घेऊ शकतात. सेंटर 2 मध्ये कोणतीही लक्षणे नसणाऱ्या सातशे रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आलेली आहे. हे केअर सेंटर लवकरच कार्यरत करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार अमीन पटेल, जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेंद्र गुजर यांनी या केअर सेंटर मधील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती दिली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.