मध्यप्रदेश, तेलंगणा सरकारप्रमाणे आपल्याकडेही भावांतर योजना लागू करावी
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी
लातूर दि.16/6/2020
केंद्र सरकारणे शेतीमाल एफ.आर.पी. प्रमाणे खरेदी करण्याबाबतचा वटहुकूम कांही दिवसापूर्वी काढला, त्यामुळे निश्चीतच शेतीमालाच्या एफ.आर.पी. बाबत हमी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शेतकर्याला हमी भावाचा लाभ मिळण्यासाठी मार्केटमध्ये एफ.आर.पी.प्रमाणे मालाची खरेदी झाली पाहीजे किंवा शासनाने स्वतःहा खरेदी करावी अथवा मध्य प्रदेश, तेलंगाना, सरकार प्रमाणे भावांतर योजना लागू केली पाहीजे कारण शासनाच्या दरामध्ये व मार्केटच्या हरभरा मालाच्या दरात 1000 रूपये किंटल मागे फरक असल्याचे मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सांगीतले.
लातूरसहीत महाराष्ट्रातील हरभरा, तूर खरेदी केंद्र दि.16 जून 2020 पासुन बंद होणार असल्याचे समजले. मुळात हारभरा खरेदी सुरूवात उशीरा झालेले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी खरेदी केंद्रावरती नोंद केलेल्या 50 टक्के पेक्षा अधिक लोकांची खरेदी झाली नाही, त्यामुळे खरेदीची मुदत 2 महिने वाढवूनही द्यावी. अन्यथा महाराष्ट्र सरकारने भावांतर योजना लागू करून मार्केट व शासनाच्या दरातील फरक शेतकर्याला द्यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व कृषि मंत्री भुसे यांच्याकडे मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.