एसीपीचे जनक जी.श्रीकांत यांचा राज्य पञकार संघाच्या वतीने गौरवपत्र देऊन सन्मान
लातूर : येथील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये एसीपीची ( अंटी कोरोना फोर्स ) स्थापना करून राज्यामध्ये एक वेगळे ओळख निर्माण केली आहे,याचाच एक फायदा म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना जास्त पसरला नाही.या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांचा गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
जी श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासासाठी फायदाच केला आहे. शहरातील 150 फूट तिरंगा झेंडा तसेच फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून त्या त्या विभागातील प्रमुखांना सोबत घेऊन सर्व सामान्य नागरिकापर्यंत त्या विभागाच्या योजनाही त्यांनी माहीत करून दिल्या तसेच दयानंद कॉलेज येथील क्रिकेटचे मैदान उभा करून एक शहराची वेगळी ओळख राज्यभर निर्माण केली आहे. लातूरचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविचा प्रयत्न केला आहे तसेच शहरातील अतिक्रमण,पार्किंगची व्यवस्था वाहनांना शिस्त लावणे लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा क्लासेस येथेहे विद्यार्थ्यांसाठी शिस्त त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर बी बियाणे उपलब्ध करून त्यांना दिलासा दिला आहे. शहरामध्ये जागोजागी शौचालय उभा करून पुरुष व महिलांचा प्रश्न निकाली काढला आहे. सायकलवर स्वतः फिरून शहरातील काय काय समस्या आहेत याकडेही ही त्यांनी लक्ष वेधले होते. या व अशा अनेक विकासाच्या कामांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आज त्यांच्या कार्यालयात जाऊन जी श्रीकांत यांचा शाल,पुष्पगुच्छ व गौरव पत्र देऊन लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे,कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे , सचिव अशोक हनवते, जिल्हा संघटक महादेव डोंबे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे जिल्हा अध्यक्ष नितिन बनसोडे, नानासाहेब कांबळे, कोषाध्यक्ष अरुण जे कांबळे, कायदे सल्लागार प्रदीप गंगणे , फारुख शेख आदींनी सन्मान केला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.