दिनू रणदिवे यांच्या निधनाने गेल्या सात दशकातील घटनांचा साक्षीदार हरपला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख






दिनू रणदिवे यांच्या निधनाने गेल्या सात दशकातील घटनांचा साक्षीदार हरपला

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 

 

मुंबई दि.१६-  ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या निधनाने देशातील विशेषत: महाराष्ट्रातील गेल्या सात दशकातील घटनांचा साक्षीदार नाहीसा झाला आहे अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे.

 

      अमित देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, दिनू रणदिवे हे सव्यसाची पत्रकार होते. देशाचे स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्यातील ग्रामीण भागापासून तर मंत्रालयात घडणाऱ्या घटनांची त्यांच्याकडे अद्ययावत माहिती असे. त्यांनी केलेले वार्तांकन नेहेमीच तटस्थपणे आणि वस्तुस्थितीला धरून असल्याने ते नेहमीच वाचनीय ठरत असे. पत्रकारितेच्या  क्षेत्रातील त्यांचे कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील असेही अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या