ब्लीचींग पावडरचा साठा संपला म्हणून मनपाचा पाणीपुरवठा बंद तर करारआभावी वीज उपकरणे ठप्प





ब्लीचींग पावडरचा साठा संपला म्हणून मनपाचा पाणीपुरवठा बंद
तर करारआभावी वीज उपकरणे ठप्प

लातूर - लातूर मनपाचा पाणीपुरवठा आज चक्कं ब्लीचींग पावडरचा साठा संपल्यामुळे बंद आहे. ब्लीचींग पावडर तथा तुरटी या पाणी शुद्धीकरणासाठी लागणार्‍या अत्याश्यक सेवांचा भाग आहे. परंतु मनपा प्रशासनाच्या गलथान करभारामुळे ब्लीचींग पावडरचा साठा वेळेत उपलब्ध केला गेला नाही.
       यावर प्रशासन लॉकडाऊनचे कारण देत आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात अशा अत्यावश्यक सेवा केन्द्र व राज्य सरकारने सुरुच ठेवल्या आहेत. केवळ मनपा च्या अकार्यक्षम प्रशासनामुळे लातूरकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे.
       शिवाय ईएसएल या कंपनीचा करार समाप्त होऊन चार महिने झाले. केवळ करार करणे इतकेच काम मनपा प्रशासनाला करावयाचे होते. परंतु यालाही लॉकडाऊनचे कारण पुढे करत हा करार प्रलंबीत ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी बल्ब, वायर खराब झाल्यामुळे दिवे बंद आहेत. यासाठी येणारा खर्च हा राज्य सरकार करते.  त्याचा कुठलाही बोजा मनपावर नाही. असे असतानाही केवळ अकार्यक्षम प्रशासकिय व्यवस्थेमुळे लातूरकरांचे हाल होत आहेत.
       ही अत्यंत निंदनीय बाब असून आज आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावर जर त्वरीत कार्यवाही नाही झाली तर कायदेशीर पद्धतीने दाद मागण्यात येईल. सदर निवेदनाची प्रत ही राज्याचे  मा. मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, वीज मंत्री,विरोधी पक्ष नेता अनुक्रमे विधानसभा व विधान परिषद, महाराष्ट्र राज्य व मा. पालकमंत्री व जिल्हाधिकारी लातूर जिल्हा यांनाही देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या