विना मास्क फिरणा-यावर औशात दंडात्मक कार्यवाही
औसा=मुख्तार मणियार
औसा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला असून औसा शहर भेटा,आंदोरा,हिप्परगा एल्लोरी,माडकोंडजी, सारोळा आदि गावातून कोरोना झालेले रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची व जनतेची चिंता वाढली आहे.औसा शहर येल्लोरी,आंदोरा,भेटा प्रत्येकी एक अशा चार रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यृही झाला आहे.औसा शहरात विना मास्क फिरणा-या चार चाकी आणि दोन चाकी वाहनाचा वाढत्या गर्दीमुळे प्रशासन अनलॉक नंतर हतबल झाले आणि.परंतू शहरातील गर्दी रोखण्यासाठी 23व24जुन रोजी व्यापा-यांनीच स्वत:हुन बंद पाळला आहे.दिं.27जुन पर्यंत आडत व्यापारही बंद आहे.दिं.25जुन रोजी मास्कचा वापर न करता फिरणारे नागरिक, वाहन चालक, व्यवसायीक व ग्राहकांना 200 रुपये दंड आकारण्याची धडक कार्यवाही नगरपालिका चे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पालिका प्रशासन खडबडून जागि झाले आहे व आधुनिक यंत्राद्वारे सॅनिटायझर व जंतूनाशक फवारणी प्रभाग निहाय सुरु केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.