दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान तातडीने द्यावे या प्रमुख मागणीसाठी मनसेही उतरणार रस्त्यावर"*







*"दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान तातडीने द्यावे या प्रमुख मागणीसाठी मनसेही उतरणार रस्त्यावर"* 
     👉 *संतोष नागरगोजे(मनसे शेतकरी सेना, प्रदेशाध्यक्ष)* 🚂🚩
                       कोरोनामुळे तसेच दुबार पेरणीच्या संकटांमुळे अगोदरच शेतकरी परेशान आहे.त्यातच शेतीला जोड म्हणून केला जाणारा दुध व्यवसायही सरकारच्या उदासीन धोरणामुळे अडचणीत आला आहे.दूध उत्पादकांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने दुधाला प्रतिलीटर *10 रुपये अनुदान तातडीने दयावे* या मागणीसाठी आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे. *कारण शासनाच्या नियमानुसार गाईच्या दुधासाठी 27 रुपये 50 पैसे तर म्हशींच्या दुधासाठी 34 रुपये दर मिळणे आवश्यक असतानाही खासगी,सहकारी,शासकीय दूध संघांनी दूध दरात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे.* त्यातच पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने व दुधाचे पेमेंटही महिना महिना मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी हा तोट्यात धंदा करतो आहे.लॉकडाऊन पूर्वी म्हशींच्या दुधाला 40 ते 45 रु भाव मिळत होता तर गाईच्या दुधाला 30 ते 32 रु भाव मिळत होता.परंतु तो  भाव अचानक कोसळल्याने दूध व्यवसाय कोलमडण्याची भीती निर्माण झालेली आहे.यावर्षी कोरोनामुळे लग्न समारंभ,सामाजिक कार्यक्रम,उत्सव,हॉटेलस, मॉल्स,स्वीटमार्ट्स,बंद असल्याने मागणी घटल्याचे कारण देऊन संघांनी भावात कपात केली आहे. *तसेच चीन युरोप व आफ्रिका या देशातील दूध पावडर निर्यात बंद झाली आहे.यामुळे देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक आहे तर राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे व तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.* *या सर्व बाबींमुळे दूध पावडरचा 330 रुपयांवरून 180 रुपयांवर आला आहे.परिणामी दुधाचा दरही 10 ते 15 रु ने कमी झाला आहे.त्यामुळे सरकारने दुधाला 10 रु लिटर प्रमाणे अनुदान द्यावे.दूध पावडरकरीता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे.दूध पावडर बटर व तूप यावरील GST कमी करण्यात यावे.तसेच अनुदानासह केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा.* या सर्व मागण्यासंदर्भात शासनाने उद्या दूध उत्पादन शेतकरी,दूध संघांचे प्रतिनिधी,शेतकरी नेते यांच्यासोबतच्या बैठकीत गांभीर्याने विचार करावा व सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या