कोरोनाच्या विशेष कर्तव्याबद्दल डॉ. रमेश भराटे सेवारत्न पुरस्काराने सन्मानित डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त लातुरात सोशियल डिस्टन्सींगचे पालन करत गौरव




कोरोनाच्या विशेष कर्तव्याबद्दल डॉ. रमेश भराटे सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त लातुरात सोशियल डिस्टन्सींगचे पालन करत गौरव

लातूर/प्रतिनिधी ः भारताचे माजी गृहमंत्री, मराठवाड्याचे भगीरथ, जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त मागच्या बारा वर्षांपासून प्रत्येक वर्षी राज्यात उल्लेखनिय कार्य करणार्‍या विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित केले जाते. त्याच पार्श्‍वभूमिवर यावर्षी महाभयानक कोरोना संक्रमणाचा सामना करत संक्रमणाला अटकाव घालण्याचा प्रयत्न करणारे लातूर येथील श्‍वसन विकार व हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भराटे यांचा लातूर येथेच त्यांच्या कार्यालयात जाऊन ह्यूमन राईट्सचे रामेश्वर धुमाळ व संपादक रूपेश पाडमुख या मान्यवरांच्या हस्ते 14 जुलै रोजी सेवारत्न पुरस्कार, मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
मिमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समिक्षा पत्रकार प्रेस परिषद, ह्युमन राईटस् फाऊंडेशन आणि मंथन क्रिएटिव्हस यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त देशभरातील नामवंत मान्यवरांचा मागच्या बारा वर्षापासून ‘डॉ. शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार’ व अन्य पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानीत करण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नऊ रत्नांना प्रत्यक्ष सोहळ्यात किंवा त्यांना त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे. सदरील सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 
सध्या जगात सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले असतानाही मानव जातीच्या अस्तित्वासाठी आणि देशहितासाठी लढणारे डॉक्टर, परिचारीका, पोलीस व इतर क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. अशाच अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी मान्यवरांचा सेवारत्न पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात येत आहे. यामध्ये मराठवाड्यातील अशा मंडळींचा सन्मान करण्यात येणार असून लॉकडाऊन नंतर हा सोहळा संपन्न होणार आहे. तत्पूर्वी लातूर येथील काही मान्यवरांचा यामध्ये गौरव करण्यात आला आहे.
दि. 14 जुलै रोजी लातूर येथील सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये मागील अनेक वर्षांपासून रूग्णसेवा करणारे गायत्री हॉस्पीटलचे डॉ.आर.टी. भराटे, यांचा सेवारत्न पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या दरम्यान कोरोना संक्रमणाची पार्श्‍वभूमि लक्षात घेऊन सोशियल डिस्टन्सींगचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी लातूर येथील ह्यूमन राईटसचे रामेश्वर धुमाळ, ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी, कृष्णा यादव, लातूर पत्रकार संघाचे काकासाहेब घुट्टे, पत्रकार नितीन पडीले, दत्ता धुमाळ व संपादक रूपेश पाडमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या यानंतर लातूर मधील अनेक मान्यवरांनी डॉ. भराटे यांचे अभिनंदन करत आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या