वीरशैव लिंगायत समाज वधू-वर मेळाव्याऐवजी यावर्षी पुस्तकाचे प्रकाशन होणार
लातूर ः लिंगायत महासंघ शाखा लातूरच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्याऐवजी कोरोनामुळे यावर्षी वधू-वरांची माहिती असलेले पुस्तक प्रकाशित केले जाणार असल्याचे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
वीरशैव लिंगायत समाजासह समाजातील सर्व पोटजातीच्या जंगम, तेली, कुंभार, माळी, फुलारी, कोष्टी यासह सर्व पोटजातीच्या तसेच विधवा, पुनर्विवाह, घटस्फोटीतांनाही या वधू-वर मेळाव्याच्या पुस्तकात आपले नाव नोंदवता येणार आहे.
या वधू-वर मेळावा पुस्तीकेत नाव नोंदवण्यासाठी आपला फॉर्म भरून देणे व त्यासोबत एक बायोडाटा व दोन पासपोर्ट फोटो देणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करणार्या पालकांना हे वधू-वर मेळावा पुस्तक मोफत दिले जाणार आहे. पोस्टाने हे पुस्तक हवे असल्यास त्यांचा चार्ज द्यावा लागेल.
यापूर्वीच्या कोणत्याही व कुठल्याही वधू-वर परिचय मेळाव्यातील नाव नोंदणी येथे ग्राह्य धरली जाणार नसून येथे नव्याने फॉर्म भरून द्यावा लागेल.
तरी गरजु पालक, उपवर, उपवधूंनी या संधीचा लाभ घ्यावा. नाव नोंदणीसाठी अंबुजा भांडी स्टोअर्स, नेलवाडकर कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर जि. लातूर येथे संपर्क करावा. (मो. 9890099792) असे आवाहन लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.