लाॅकडाउनच्या काळातील विजबील माफ करण्याची मागणीसाठी एम आय एम चे निवेदन
औसा मुख्तार मणियार
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळातील विजबील माफ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे एम आय एम च्या वतीने करण्यात आली आहे.या निवेदनात त्यांनी लिहिले आहे २० मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले त्यानंतरही राज्य व जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन असल्या कारणाने
लोकांचे रोजगार बंद आहे.रोजगार नसल्याने नागरिकांचे खाण्यापिण्याची हाल होत आहेत.तसेच सर्व व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक सुध्दा अडचणीत आले आहे.अशा बिकट आर्थिक परिस्थितीत लोकांचे जगणे कठीण झाले आहे.यातच लोक आपल्या दैनंदिन खर्च करण्यास असमर्थ झाले असून विज वितरण कंपनीने हजारो,लाखो विज बिल दिले आहेत.जे भरणे नागरिकांना कठिणच आहे .औशाच्या वतीने .एम आय एम चे अफसर शेख यांनी एम आय एम पक्षाच्या वतीने महावितरण कंपनी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.लॉकडाउनच्या काळातील विज बिल सरसकट माफ करण्याची मागणी आज दिनांक २० जुलै २०२०सोमवार रोजी रात्री आठ वाजता पांच मिनिटे लाइट बंद करून शासकिय लक्ष वेधण्याची अपील केली आहे.या निवेदनावर एम आय एम चे अफसर शेख यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.