लातूर येथील खाजगी रूगणालयात कोवीड१९ रूग्णावर होणार उपचार
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आवाहनास प्रतीसाद
लातूर प्रतिनिधी : (वार १८ जूलै)
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर येथील फुलाबाई बनसोडे रुग्णालय, लातूर सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल आणि एमआयएमएसआर मेडीकल कॉलेज या ७ रुग्णालयांनी कोवीड१९ रुग्णावर उपचार करण्याची तयारी केली असून आणखी काही रूग्णालयात लवकरच ही सेवा सुरू होत आहे. कोविड१९ रुग्णसेवा देणाऱ्या खाजगी रुग्णालयात रॅपिड अँटीजीन तपासणी सुविधाही देण्यात येत आहे. याशिवाय कांही खाजगी प्रयोगशाळानाही तपासणीची लवकरच अनुमती मिळणार आहे
कोवीड१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात ही उपचार सुरू करणे गरजेची आहे, असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले होते. यासाठी १५ जूलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत राज्य शासनाचे अधिकारी, महापालिकेचे पदाधिकारी, आरोग्य विभाग तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
कोवीड१९ रुग्णावर उपचार करण्यासाठी शासनाने अद्ययावत साधनसामग्रीसह पुरेशी व्यवस्था उभी केली आहे, मात्र यासाथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, खाजगी रुग्णालयांनीही या उपचार सुविधेसाठी सज्ज असले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री ना. देशमुख यांनी या बैठकीत केले होते. या सेवेसाठी पुढे येणाऱ्या खाजगी रूग्णालयाच्या आणि संबंधित डॉक्टरांच्या काही अडचणी असतील तर त्या तातडीने सोडवण्यात येतील असे त्यांनी म्हटले होते. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात इतर आजारावरही उपचार करण्यात येतात ही बाब लक्षात घेऊन त्या रुग्णालयातून काही बेडची कोवीड१९ रुग्णासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी असेही पालकमंत्री देशमुख यांनी सुचवले होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोवीड१९ रुग्णावर उपचार करण्याच्या दृष्टीने काही वेळ दयावा असे म्हटले होते. इंडियन मेडिकल असोसिएशन पदाधिकार्यांयच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार फुलाबाई बनसोडे रुग्णालयाने तातडीने प्रतिसाद देत आज सोमवार दिनांक 20 जुलैपासून कोवीड१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज वार्ड तयार करून सेवा सुरू केली आहे. या शिवाय लातूर सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल आणि एमआयएमएसआर येथे कोवीड१९ रूग्णावर उपचार करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याच बरोबर काही दिवसात इतर आणखी काही रूग्णलये या सेवेत रूजू होत आहेत. खाजगी डॉक्टराकडून मिळत असलेल्या प्रतिसादा बददल पालकमंत्री ना. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. या हॉस्पिटलना औषध उपलब्ध तिची कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याशिवाय त्यांना इतर समस्यांना सामोरे जावं लागू नये याची काळजी घेतली जाईल असेही पालक म्हणून ना. देशमुख यांनी म्हटले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.