कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 54 रुग्ण
· 167 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.24: जिल्ह्यात 54 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये अँटीजन टेस्टद्वारे तोफखाना 12 व्यक्ती, मंगळवारा 10 व्यक्ती, तलाबकट्टा 4 व्यक्ती, आझम कॉलनी 12 व्यक्ती, पेंन्शनपुरा 5 व्यक्ती असे एकूण 43 जण तर इतर 11 व्यक्तींचा समावेश असून असे एकुण 54 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तसेच कोरोना केअर सेंटर, वसमत अंतर्गत 6 व जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील 1 रुग्ण असे एकूण 7 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 13 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 506 रुग्ण झाले असून त्यापैकी 334 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 167 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 5 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.