लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजारच्या समिप: आज एकाच दिवशी 84 पाँझीटीव्ह रुग्ण .*



*लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजारच्या समिप: आज एकाच दिवशी 84 पाँझीटीव्ह रुग्ण ...*
 लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस गंभीररुप धारण करीत असून आज एकाच दिवसांत 84 नविन पाँझीटीव्ह रुग्णांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. तसेच शेकडो अहवाल प्रलंबीत असल्याचे कळते.
 जिल्ह्यातील लातूर शहर, उदगीर शहर व औसा शहर हे सध्या कोरोना आजाराचे हाँटस्पाँट ठरले असून ग्रामीण भागात ही रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसते.
 जिल्ह्यात आज रोजी 993 रुग्ण अस्तित्वात असून रुग्णालयात ईलाज सुरु असल्याचे प्रशासकीय आकडेवारी वरुन स्पष्ट होते.
   औसाचे आमदार श्री. अभिमन्यु  पवार यांनी काही दिवसांपुर्वी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांना लेखी पत्र देवून औसा शहरातील विलगीकरण केंद्रातील सुविधा व मनुष्यबळा विषयी मागणी केली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधी सदरहू मागणी करावे लागते म्हणजेच शासन-प्रशासनाने केलेल्या उपाययोजना विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते.
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने ही स्वतःच्या आरोग्याची भिस्त शासन-प्रशासनवर अवलंबून ठेवण्यापेक्षा जागरुक राहून आरोग्याविषयी उपाययोजना शोधणे गरजेचे झाले असल्यासम परिस्थिती निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या