निलंग्यात १८ दुकानदार, दुचाकीस्वारांवर कारवाई,91 हजार दंड वसूल!
(मोईज़ सितारी)
निलंगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाच्या वतीने १८ दुकानदारांवर, दुकचाकीवर डबलसीट जाणाºया विरोधात दंडात्मक कार्यवाही केली़ यावेळी लॉकडाऊन लागल्यापासून निलंग्यातील ही पहिलीच मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने याचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाने सोशल डिस्टन्स, मास्क वापरावे, दुचाकीवरून डबलसीट प्रवास करु नये अशा सूचना दिल्या होत्या. याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने विनंती करुनही अनेक नागरिकांकडून नियमाची पायमल्ली होत असल्याने दि १४ रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार गणेश जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, मुख्यधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांनी निलंगा शिवाजी चौक परिसरात रस्त्यावर उतरून कारवाई करण्यास सुरुवात केली.
दुकानदारांना घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८ दुकानदारांना २ हजार रुपये प्रमाणे ३६,००० हजार रुपये दंड स्वत: अधिका-यांनी फाडला तर पोलीस, नगरपालिका यांच्या संयुक्त टिमने मास्क न वापरणाºया १४ जणांकडून ७,००० हजार दंड, दुचाकीवरून डबलशीट ७४ जणांकडून ३७,००० हजार दंड, गाडीची कागदपत्रे न बाळगणे ५९ जणांकडून ११,८०० रुपये असे एकूण १६५ जणांकडून ९१ हजार ८०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. लॉकडाऊन लागल्यापासून ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने प्रशासनाचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.