आय आयटी साठी हिप्परगा गावातील अमीत गाडेकरची निवड




आय आयटी साठी हिप्परगा गावातील अमीत गाडेकरची निवड
औसा मुख्तार मणियार
औशा तालुक्यातील हिप्परगा येथील अमीत बालाजी गाडेकर या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी गेटच्या परिक्षेत ७२•३३ टक्के गुण मिळवून देशातील यादीत ३७ वा क्रमांक मिळवला असून आय आयटी च्या पदव्यूत्तर शिक्षणासाठी पव ई मुंबई येथे निवड झाली आहे. हिप्परगा येथील अमीत बालाजी गाडेकर यास लहानपणापासूनच नियमित पणे जिद्दीने शिक्षण घ्यायची आवड पाहून बाहेर गावी पाठविण्यात आले.निलंगा, उदगीर व लातूर येथे शालेय शिक्षण घेऊन लातूर येथील नामांकित दयानंद कॉलेज मधुन १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. नांदेड येथे बीटेकचे शिक्षण पूर्ण केले.आयआयटीच्या पूर्व परिक्षेत ७२•३३ टक्के गुण घेत देशातील गुणवंतांचा यादीत ३७ वा क्रमांक मिळवला. त्याच्या या घवघवीत यशामुळे आयआयटी होण्याचा गावात पहिला मान मिळवला असून कानपूर,रुरकी,गुहावटी व पव ई मुंबई येथून निवडीचे पत्र मिळाले आहे.पुढील शिक्षणासाठी पव ई मुंबईची निवड करुन प्रवेश घेतला आहे.या घवघवीत यशामुळे कवळी,माळकोंडजी,माळूंब्रा,वांगजी या जवळपासच्या सर्वच गावातील विध्यार्थी व गावकरी कौतुक करत आहेत.



रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश  दूर करती है


मिलने का पता

WHealthier clinic
Faazilpura, Aurangabad

Order online..
9067678678

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या