शिवाजी विद्यालयाची गुणवत्तेत यशस्वी भरारी गुणवत्तेची कायम परंपरा ः 95.65 टक्के निकाल



शिवाजी विद्यालयाची गुणवत्तेत यशस्वी भरारी
गुणवत्तेची कायम परंपरा ः 95.65 टक्के निकाल

लातूर दि.29/07/2020

शिक्षण क्षेत्रात अग्रनामांकित असलेल्या जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित बिटरगाव येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मार्च-2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविले आहे. या विद्यालयाचा एकूण निकाल 95.65 टक्के लागला असून या शाळेतील गुणवत्ततेचा आदर्श इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
एकूण 23 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल 95.65 टक्के लागलेला आहे. यामध्ये अभिषेक राठोड या विद्यार्थ्यांने 88.40 टक्के गुण घेवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. रोहीत बुलबुले यांनी 74.7 टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर अमित रामदास बोराडे या विद्यार्थ्याने 74.20 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविलेला आहे.   त्यांच्या या यशाबद्दल जेएसपीएम या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर,  संस्थेचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, उपकार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक संचालक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक व्ही.बी.जाधव , मुख्याध्यापक ए.एन.जाधव, प्रभारी मु.अ.गणेश कदम, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या