*प्रतिभा निकेतन सेमीचा प्रतिक पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार*
मुरुम : येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून प्रतिक पाटील याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्याला ९९.६० टक्के गुण मिळाल्याबद्ल त्यांचा सत्कार माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, मुरुमच्या नगराअध्यक्षा सौ.सुनिता अंबर,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव,उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील,उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,आप्पासाहेब हाळ्ळे आदिंनीही त्यांचे विशेष कौतुक करुन आभिनंदन केले. तसेच विविध संस्था यांच्या कडुन ही कौतुक करण्यात आले
यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष रसिद गुक्तेदार,चंद्रकांत बालकुंदे, आप्पासाहेब हाळ्ळे, प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.करबसाप्पा ब्याळे, प्रा.शिवाजी राजोळे, प्रा.विठ्ठल चलपते, प्रा.उमाकांत महामुनी आदिंनी त्याचे कौतुक केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.