औसा शहरातील हॉटेल वर छापा टाकून १ लाख ४९ हजारांची बेकायदेशीर दारु जप्त
औसा मुख्तार मणियार
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लातूर जिल्ह्यात सध्या १५ जुलै पासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध बेकायदेशीर दारु विक्री निर्माती व वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम सुरू असून २८ जुलै रोजी एका हॉटेलवर छापा टाकून बेकायदेशीर दारु जप्त करण्यात आली.औसा शहरातील याकतपूर रोडवरील हॉटेल गोल्डन डिरीम या बारच्या वरच्या मजल्यावर छापा टाकला असता तिथे लपवून ठेवलेली गोवा राज्य निर्मीत विदेशी दारू १२० लिटर,६२ बिअर ज्यांची अंदाजे किंमत १ लाख ४९ हजार ३७३ रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक आर एम बांगर, दुय्यम निरीक्षक एस आर राठोड, दुय्यम निरीक्षक आर जी राठोड,जवान अनिरुद्ध देशपांडे,निलेश गुणाले, हणमंत मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.