प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२०-२१ पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि.३१ जूलै २०२० आहे.मुख्तार मणियार
नैसर्गिक आपत्ती,किड आणि रोगामुळे होणा-या पिकाच्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्रशासन व राज्यशासनाच्या माध्यामाने खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत तालुक्यातील मंडळातील अधिसूचित पिकासाठी राबविण्यात येत आहे.त्यानूसार चालू वर्षाच्या २०२०-२१ खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी बॅंकेकडे पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दि.३१-०७-२०२० पर्यंत आहे.औसा तालूक्यात एकूण ६ पिका करीता हा हप्ता भरता येणार आहे.हा पिक विमा ७0% मुग, उडीद या प्रमुख पिकासोबत बाजरी,ख.ज्वारी,याही पिकाचा समावेश केलेला आहे.हा पिक विमा ७०% जोखिम मस्तरा प्रमाणे भरता येणार आहे. शेतकऱ्यांने भरावयाचे विमा हप्ता प्रति हेक्टरी सोयाबीन ९०० रुपये,तूर ७०० रुपये,मुग, व उडीद ४०० रुपये,बाजरी ४००रु.ज्वारी ५०० रुपये विमा हप्ता प्रति हेक्टरी असा आहे.तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बॅंकेचे कर्ज खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बॅकेसी संपर्क करावा.त्याच प्रमाणे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बॅक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावे. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून गावपातळीवर पूरक नोंदनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे अर्ज विमा हप्ता मार्फत आॅनलाईन पद्धतीने स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. याकरिता राज्यात सी. ए. स. सी.ई. गवर्हनस सरव्हीसेस इंडिया लिमिटेड द्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र)सूविधा शेतकऱ्यांना अर्ज भरण्याकरिता उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच शेतकरी स्वत:(www agrl-lnsurance.goo.ln) या पोर्टल आधारे सुध्दा अर्ज करु शकतात.तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सदर पोर्टल अथवा केंद्रामार्फत अर्ज करावे.पिक विमा भरण्यासाठी बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.औसा तालुक्यातील जा शेतकऱ्यास पिक विमा भरावयाचा असेल त्यांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन पिक विमा भरावा. यासाठी शेतकऱ्यांचे बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे.विमा भरण्यासाठी ७/१२ ,८ अ उतारा व संबंधित पिकाचे स्वयंघोषित पेरणी प्रमाणप्रत्र बॅंकेत देणे बंधनकारक आहे अधिक माहितीसाठी संबंधित कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी औसा यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.