कोरोनातुन बाहेर आलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावा- आ.अभिमन्यू पवार
औसा मुख्तार मणियार
कोरोनातून बाहेर आलेल्या व्यक्तींनी कोरोनातील गंभीर रुग्णांसाठी आपला प्लाझ्मा दान करावा असे आवाहन कोरोनावर मात करून बाहेर आलेल्या औशाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी दि.१९ जुलै २०२० रविवार रोजी गुगल मीट च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. आ.अभिमन्यु पवार व त्यांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली होती. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० दिवसांच्या उपचारानंतर पवार यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली.दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आ. पवार यांनी यावेळी त्यांनी कोरोनातून बरे झाल्यामुळे अन्य कोरोना रुग्णांसाठी आपला व आपल्या मुलाचा रक्तद्रव्य (प्लाझ्मा)दान करणार असल्याचे सांगितले.कोरोना बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार झालेले प्रतिजैविकांचा उपयोग अन्य कोरोना बाधित रुग्णाच्या उपचारासाठी लाभदायक ठरणार असल्याचे वैद्यकीय शास्त्रातील तंज्ञाचे मत आहे.त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याची मोहीम आपण सुरू करीत आहोत.रक्तदानाप्रमाणेच प्लाझ्मा दान ही मोहीम राबविण्याच्या आवाहनाला काही युवक मित्रांनी प्रतिसाद दिला असून प्लाझ्मा दान करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.या पुढील कालावधीत कोरोनावर मात केलेल्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी आ.अभिमन्यू पवार यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.