हिंगोली जिला वार्ता महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थाकडून उज्वला योजनाकरीता प्रस्ताव मागणीस मुदतवाढ



महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या
संस्थाकडून उज्वला योजनाकरीता प्रस्ताव मागणीस मुदतवाढ
 
हिंगोली,दि.30: अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व उज्वला योजनेचा लाभ घेण्याकरीता संस्थाना दि. 25 जुलै, 2020 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सदर प्रस्ताव मागविण्याच्या दिनांकात मुदतवाढ करण्यात आली असून प्रस्ताव मागविण्याची अंतिम दिनांक 24 ऑगस्ट, 2020 करण्यात आली असल्याचे महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे.
त्यासाठी पुढील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेमध्ये किमान महिलाकरीता सुविधा उपलब्ध असावी. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान पाच वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान वीस लाख रुपयांचा असावा. संस्थेच्या नांवे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे. योजना राबविण्याकरिता इच्छूक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी सदर संस्थेचे कायमस्वरुपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालय त्याच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे, संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा. तसेच योजना राबविण्याचे निकष दि. 27 मार्च, 2018 मधील शासन निर्णयानुसार असावेत. फक्त प्रतिबंध किंवा सुटका हे घटक राबविणाऱ्या संस्थांना योजनेअंतर्गत मान्यता देण्यात येणार नाही. उज्वला योजनेच्या प्रस्तावासोबत द्यावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र-ब) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली कार्यालयास दि. 24 ऑगस्ट, 2020 पूर्वी संपर्क साधून कागदपत्रांसाठीची प्रपत्र-ब ची यादी प्राप्त करुन द्यावी. तसेच परिपूर्ण प्रस्ताव दि. 24 ऑगस्ट, 2020 पर्यंत सादर करावेत.
****
   
कोरोना विषाणू नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना
·   नागरीक तथा लोकप्रतिनिधींनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
 
हिंगोली,दि.30: जिल्ह्यात ग्रामीण भागात कोव्हिड-19 (कोरोना) विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळून येत आहे. याकरीता विविध यंत्रणाकडून होत असलेल्या कार्यवाहीची एकत्रित माहिती जिल्हास्तरीय कक्षाकडे मिळण्यासाठी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशान्वये जिल्हा नियंत्रण कक्षाची (कंट्रोल रुम) स्थापना करण्यात आली असून त्यासाठी पुढील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अ.क्र.
नाव
नियुक्ती
1
श्री. धनवंत माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
समन्वयक-जिल्हा नियंत्रण कक्ष
2
डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.हिंगोली
सदस्य
3
डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग
सदस्य
4
श्री. यू.एल.हातमोडे, स.प्र.अ., सा.प्र.वि.
सहायक
5
श्री. राधेश्याम परांडकर, का.प्र.आ. पशुसंवर्धन विभाग
सहायक
6
श्री. सुनिल गुठ्ठे, क.प्र.अ. पंचायत विभाग
सहायक
7
श्री. अनिल केदार, विस्तार अधिकारी, सां.मबाक
सहायक
8
श्री. के.वाय.इशि, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विभाग
सहायक
कोरोना विषाणू जिल्हास्तरीय नियंत्रण सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद येथून करण्यात येणार आहे. कोरोना संबंधित अत्यावश्यक माहितीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षातील डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग मो. 9822335273 यांच्याशी संपर्क साधावा. कोरोना विषाणूसंदर्भात सर्व आदेश, संचिका, माहिती एकत्रित करण्यात येणार असून रोजच्या रोज कोरोना विषाणूबाबतची माहिती वरिष्ठांच्या निर्देशनास आणून देण्यात येणार आहे.
सदर समितीतील अधिकारी/कर्मचारी साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध यंत्रणासोबत समन्वय साधणार असून ग्रामीण भागातील नागरीक तथा लोकप्रतिनिधी यांना कोविड-19 च्या अनुषंगाने काही समस्या असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहान जिल्हा परिषादेचे अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनाचे पालन करुन बकरी ईद साजरी करावी
                                                                                                            -   जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
 
        हिंगोली, दि.30: सद्यस्थितीत कोरोनाचा (कोवीड-19) प्रादूर्भाव अधिक प्रमाणात पसरत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच काही जणांचा या संसर्गामुळे मृत्यू देखील झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897  दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्याबाबतची नियमावली तयार केली आहे. तसेच शासनाने दि. 17 एप्रिल,2020 रोजीच्या आदेशान्वये एकत्रीत सुधारीत मार्गदर्शक सूचना देखील निर्गमीत केल्या आहेत.
            सद्या कोरोना संसर्गामुळे वाढत असलेल्या रुग्णाची संख्या लक्षात घेता मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण जवळ आला असून मुस्लीम बांधव दरवर्षी हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात. बकरी ईदच्या निमित्ताने मूस्लीम बांधव हे मोठ्या संख्येने मशीदमध्ये एकत्र येवून सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. परंतू सद्य परिस्थितीचा विचार करता एका ठिकाणी अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होवून मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. याकरीता कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मूस्लीम बांधवाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हिताचे नाही. त्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व मुस्लीम धर्मीय नागरिकांना खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. या सूचनाचे पालन करुन आपण आपले व आपल्या कुटूंबाच्या आरोग्याचे रक्षण करत बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा.
            कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बकरी ईदची नमाज मशीद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. तसेच कुर्बानीसाठी मुस्लीम बांधवांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादूर्भाव पसरु नये याकरीता प्रतिबंधीत क्षेत्रातील मुस्लीम बांधवांनी आपल्या नावांने ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करुन घ्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एकत्र येवू नये. घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नमाज पठण करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रमासाठी एकत्रित येवू नये.  तसेच महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडु नये, घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखावे तसेच वेळोवेळी हात धुणे आदी नियमाचे पालन बकरी ईद सणाच्या दिवशी कटाक्षाने करावे. सर्व मूस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नमाज पठण आदी धार्मीक कार्य पार पाडावे. कोरोना (कोवीड-19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे.
            करोनाची साथ झपाट्याने वाढत असून जिल्हा प्रशासनाकडून ती रोखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न आपण करीत आहोत. मागील 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण नियमाचे पालन करुन मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने नियमांचे पालन करून साजरी व्हावी', अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या