*ॲड एस एस पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण ,सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व हरपले*
-आ. विक्रम जी काळे
आलमला गावाचे सुपुत्र रामनाथ माध्य., उच्च माध्यविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रम, डीएड कॉलेजच्या माध्यमातून गावात शिक्षणाची पंढरी निर्मान करणारे मा. स्व. एस.एस. पाटील पाटील यांनी . लातूर येथील सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन , सुप्रसिद्ध विधिज्ञ , जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावान पदाधिकारी म्हणून असलेले पण त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे अशी प्रतिक्रिया मराठवाडयाचे शिक्षक आ. विकम जी काळे यांनी व्यक्त केली आहे.ॲड एस एस पाटील हे लातूर जिल्हा वकील मंडळातील एक ज्येष्ठ कायदेतज्ञ होते. लातूर जिल्हा काँग्रेस मध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनही ते ओळखले जायचे. सहकार, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. स्व. वसंतराव काळे, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, स्व. विलासराव देशमुख साहेब यांचे ते सहकारी होते . त्यांचे आमच्या कुटुंबियांशी कायम स्नेह होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे काळे कुटुंबियांना दुःख झाले आहे, . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, पाटील परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे असेही आ. विक्रमजी काळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.